अहमदनगर Live24 टीम, 30 ऑक्टोबर 2021 :- श्रीगोंदे तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील कर्मयोगी कुंडलीकराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ शनिवारी ३० रोजी सकाळी साडेनऊ वाजता होणार आहे.
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक माजी आमदार राहुल जगताप असणार आहेत.
यावेळी आमदार संग्राम जगताप, आमदार नीलेश लंके, राज्य साखर संघाचे संचालक घनश्याम शेलार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस, नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे,
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, जिल्ह्यातील व तालुक्यातील शेतकरी व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत.
या कार्यक्रमास कोरोना नियमांचे पालन करून शेतकरी व सभासदांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कारखान्याच्या उपाध्यक्ष ललिता उगले व संचालक मंडळाने केले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम