लवकरच येत आहे सर्वात मस्त Electric Scooter जी तुम्ही चालवू शकाल ड्रायव्हिंग लायसन्स शिवाय…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑक्टोबर 2021 :-  एक नवीन इलेक्ट्रिक मोबिलिटी ब्रँड Corrit Electric या महिन्याच्या अखेरीस म्हणजेच ऑक्टोबर 2021 पर्यंत भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक बाइक (हॉवर स्कूटर) लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. हॉवर स्कूटर प्रथम दिल्लीत लॉन्च करण्यात येणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.

यानंतर, पहिल्या टप्प्यात, कॉरिट आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर मुंबई, बँगलोर आणि पुणे अशा इतर शहरांमध्ये लॉन्च करेल. Corrit Electric सध्या 1100 रुपयांत बाईकसाठी प्री-बुकिंग घेत आहे

आणि 25 नोव्हेंबर 2021 पर्यंत डिलिव्हरी सुरू करेल. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही बाइक टिनएजर्ससाठी आणि लोकप्रिय पर्यटन स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी तयार करण्यात आली आहे.

टिनएजर्ससाठी खास :- कंपनीचे म्हणणे आहे की ही स्कूटर खास 12 ते 18 वयोगटासाठी तयार करण्यात आली आहे. त्याचबरोबर गोवा किंवा जयपूरसारख्या शहरांतील पर्यटकांच्या आकर्षणासाठीही त्याची रचना करण्यात आली आहे.

याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे ते दोन्ही टोकांना डिस्क ब्रेक, ट्यूबलेस टायर आणि 250 किलो भार क्षमता असलेले ड्युअल शॉक एब्जॉर्बर यांनी सुसज्ज असेल.

ड्रायव्हिंग लायसन्सची गरज भासणार नाही :- हूवर इलेक्ट्रिक स्कूटरचा कमाल वेग केवळ 25 किलोमीटर प्रति तास असेल, त्यामुळे ती चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सची गरज भासणार नाही.

खरं तर, 250 वॅटपेक्षा कमी पॉवर आउटपुट आणि 25 किमी प्रतितास पेक्षा कमी वेग असलेल्या काही बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी केंद्रीय मोटर वाहन नियमांनुसार (CMVR) इलेक्ट्रिक सायकल किंवा ई-बाईकच्या श्रेणीत येतात. कोणत्याही ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय ही वाहने चालवता येतात.

कॉरिट इलेक्ट्रिकचे सह-संस्थापक मयूर मिश्रा म्हणाले, “आमची पहिली इलेक्ट्रिक बाईक Hover लाँच करून, मुलांसाठी टिकाऊ, पर्यावरणपूरक आणि सोयीस्कर प्रवास पर्याय उपलब्ध करून देण्याचे आमचे ध्येय आहे.

या कलर पर्यायांमध्ये लॉन्च केले जाईल :- रिपोर्ट्सनुसार, ही स्कूटर लाल, पिवळा, निळा, गुलाबी, जांभळा आणि काळ्या रंगात सादर केली जाईल.

याशिवाय ग्राहकांना त्यांच्या आवडीचा रंग निवडण्याचा पर्यायही मिळणार आहे. कंपनी या इलेक्ट्रिक स्कूटरसाठी आकर्षक फायनान्स सुविधा देत आहे, इच्छुक ग्राहक ते लीजवर देखील घेऊ शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe