अहमदनगर Live24 टीम, 31 ऑक्टोबर 2021 :- अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून एकूण १६ कोटी ५९ हजार रुपये अनुदान प्राप्त झाले असून, हे अनुदान लवकरच शेतकऱ्यांना वितरित कले जाणार आहे.
मागील महिन्यात शेवगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेती, शेतीपिके व पशुधनाचे प्रचंड नुकसान झाले होते. नुकसानग्रस्तांना भरपाई मिळण्यासाठी आमदार मोनिका राजळे यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता.
तसेच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले होते. अखेर त्याला यश आले असून, तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसानभरपाईपोटी १० कोटींचा निधी शेवगाव तहसील कार्यालयाला प्राप्त झाला आहे.
ते लवकरच सर्व शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे. यामुळे बडुले बु., खरडगाव ,जोहरापूर,खामगाव, आखेगाव ति. व डोंगर, वरूर खुर्द ,वरूर बु., भगूर, कांबी, गा. जळगाव. या गावातील शेतकऱ्यांना लवकरच हा निधी वितरीत केले जाईल.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम