अहमदनगर Live24 टीम, 31 ऑक्टोबर 2021 :- देशात आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग पाचव्या दिवशी वाढ झाली आहे. त्यामुळे देशभरात इंधनाच्या किंमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत.
सरकारी मालकीच्या तेल कंपन्या IOC, HPCL आणि BPCL यांनी रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे 35-35 पैशांची वाढ केली आहे. त्यामुळे पेट्रोलने 121 रुपये प्रतिलीटर आणि डिझेलने 112 रुपये प्रतिलीटरचा टप्पा ओलांडला आहे.
आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल-डिझेल दरवाढीनं उच्चांक गाठला आहे. महिनाभरात मुंबईत पेट्रोल प्रतिलीटर 6.82 रुपयांनी महागलं आहे. दोन ऑक्टोबर रोजी मुंबईत पेट्रोलची किंमत प्रतिलीटर 108.18 रुपये इतकी होती. आज मुंबईत पेट्रोलची किंमत 115 रुपयांच्या पुढे गेलं आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये दररोज 30 ते 40 पैशांनी वाढ होत आहे. दररोज वाढणाऱ्या इंधन दरवाढींमुळे सर्वसामान्य हैराण झाले आहेत. राज्यात पेट्रोल-डिझेलची सर्वाधिक किंमत परभणीमध्ये आहे. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो.
सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो. आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात.
इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे.
या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम