अहमदनगर Live24 टीम, 31 ऑक्टोबर 2021 :- धनंजय मुंडे यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी मजुर महामंडळाला निधी उपलब्ध करुन दिला आहे.
त्यामुळे धनंजय मुंडे हेच गोपीनाथ मुंडे यांचे खरे राजकीय वारसदार आहेत, असे प्रतिपादन कुकडी कारखान्याचे चेअरमन तथा माजी आमदार राहुल जगताप यांनी केले.
श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या गव्हाण पूजन व गाळप हंगाम शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलताना माजी आ. जगताप म्हणाले की, मला विविध पदांवर काम करण्याची संधी मिळाली आहे. या संधीचे सोने करत कुंडलिकराव जगताप तात्या यांनी उसाच्या बाजारभावाच्या बाबतीत स्पर्धा तयार केली.
या स्पर्धेत ते जिल्ह्यात आघाडीवर राहिले आहेत आणि मी देखील तात्यांचा पठ्ठा असल्याने स्पर्धेत राहून उसाचा बाजार भाव जिल्ह्यात एक नंबर देणार आहे.
मात्र दुसरीकडे साखर कारखाने अडचणीत आणण्याचे काम भाजप सरकारने केले आहे, अशा टीका केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम