अहमदनगर Live24 टीम, 31 ऑक्टोबर 2021 :-अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याने ती गरोदर राहिली. तिच्यावर अत्याचार करणार्या तरूणाविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यातअत्याचार, अॅट्रोसिटी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
सतीश राजेंद्र सपकाळ (रा. भिंगार) असे आरोपीचे नाव आहे. त्याला रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके करीत आहे. अल्पवयीन मुलगी 28 सप्टेंबर रोजी घरातून निघून गेली होती. यासंदर्भात तिच्या आईने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी तिला शिर्डी येथुन ताब्यात घेतले. तिने घरी राहण्यास नकार दिल्याने पोलिसांनी तिला बालसुधारगृहात ठेवले. तिच्या आईने तिला घरी नेले.
घरात वाद झाल्यामुळे ती घरातून निघून गेली. पोलिसांनी पुन्हा तिचा शोध घेऊन तिला बालसुधारगृहात पाठविले. दरम्यान, बालसुधारगृहात तिची तपासणी करण्यात आली असता ती गरोदर असल्याचे निदर्शनास आले.
याबाबत बाल कल्याण समितीकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता सपकाळ याच्यासोबत तिचे संबंध आल्याचे समोर आले. पोलिसांनी सपकाळविरोधात अत्याचार, अॅट्रोसिटी कलमान्वये गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम