अहमदनगर Live24 टीम, 01 नोव्हेंबर 2021 :- राहता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंबाची मोठ्या प्रमाणात आवक झाली असून यामधील चांगल्या डाळिंबाला सव्वाशे हुन अधिकचा दर मिळाला आहे. तसेच बाजार समित्यांमध्ये आता मालाची आवक वाढू लागली आहे.
राहाता बाजार समितीत डाळिंबाच्या 2 हजार 643 क्रेट्स डाळिंब आवक झाली, प्रतिकिलोला 175 रुपये भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.
डाळिंब नंबर 1 प्रतिकिलोला 121 ते 175 रुपये असा भाव मिळाला. तर डाळिंब नंबर 2 ला 81 ते 120 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 41 ते 80 रुपये इतका भाव मिळाला.
डाळिंब नंबर 4 ला 10 ते 40 रुपये भाव मिळाला. सीताफळच्या 32 क्रेट्सची आवक झाली. क्विंटलला सर्वाधिक 2000 रुपये भाव मिळाल्याचे देवकर यांनी सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम