जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुनील पोखरणा यांच्या शासकीय वाहनाने आज सायंकाळी सव्वापाच-साडेपाचच्या सुमारास अचानक पेट घेतल्याने एकच धावपळ उडाली.
प्रसंगावधान दाखवत जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी आग प्रतिरोधक किटचा वापर कारला लागलेली आग नियंत्रणात आणली.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पोखरणा हे दुपारी चारच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयातील एक बैठक आटोपून
शासकीय कार क्रमांक एमएच 16 एन 0477 ने जिल्हा रुग्णालयात आले. त्यानंतर काही वेळाने ते आपल्या खाजगी कारने पुन्हा बैठकीला जिल्हाधिकारी कार्यालयात गेले.
त्यानंतर काही वेळातच रुग्णालयाच्या दर्शनी भागात उभ्या केलेल्या शासकीय कारच्या बोनेट मधून धूर आणि आग दिसून आली. बघता-बघता कारच्या पुढील भागातुन आगीच्या ज्वाला भडकू लागल्या.
अचानक कारला आग लागल्याने सर्वांचीच धावपळ उडाली. या दरम्यान रुग्णालयात असलेल्या इमर्जन्सी फायर सेफ्टीने वायूचा मारा करत लागलेल्या आगीवर नियंत्रण आणण्यात आले