विखे पाटील म्हणाले…सरकार ऐन दिवाळीत शेतकर्‍यांची दिवाळी अंधारात घालणार का?

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 02 नोव्हेंबर 2021 :- वाढीव वीज बिल देऊन राज्यातील शेतकर्‍यांना सरकारने अर्थिक संकटात टाकले आहे. कोरोना संकट आणि नंतर राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झाला आहे.

शेतकर्‍यांच्या उत्पादीत मालाला भाव मिळू शकला नाही. राज्य सरकारची कोणतीही मदत शेतकर्‍यांना पोहचू शकलेली नाही अशा परिस्थितीत वीज बिलाची वसुली करून सरकार ऐन दिवाळीत शेतकर्‍यांची दिवाळी अंधारात घालणार का? असा सवाल भाजप नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला.

संगमनेर येथे माध्यमांशी बोलतांना आमदार विखे म्हणाले, मुळातच शेतकर्‍याचे संपूर्ण वीज बील माफ करावे ही आमची मागणी आहे. परंतु राज्य सरकारला शेतकर्‍याच्या प्रश्नांचे कोणतेही देणेघेणे नाही.

महाविकास आघाडी सरकार फक्त घोषणा करते परंतु कोणतीही अंमलबजावणी करीत नाही. शेतकर्‍यांकडील वीज देयके साखर कारखान्यांनी वसूल करण्यासंबंधीचे पत्रक काढण्याचा कोणताही अधिकार साखर आयुक्त कार्यालयाला नाही.

त्यामुळे शेतकर्‍यांची वीजबील वसुली करण्यासंबंधीचे परीपत्रक तातडीने मागे घ्यावे, अशी मागणी विखे पाटील यांनी केली. कोणत्याही कारखान्याने शेतकर्‍यांकडून वीज बिलाची वसुली करू नये अन्यथा शेतकरी आंदोलन करून

सरकारलाच धारेवर धरतील, असा इशारा आ. विखे पाटील यांनी दिला. याबाबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हे पत्रक मागे घेण्याची आपण मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe