अहमदनगर Live24 टीम, 02 नोव्हेंबर 2021 :- श्रीरामपूर नगरपालिकेच्या मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे या विषयावरून गदारोळ झाला. हा विषय संपत नाही म्हणून एका विषयावरून दुसर्या विषयावर सभेचे कामकाज पुढे चालणार नसेल
तर यापुढील सर्व विषय मंजूर करण्यात यावे अशा प्रकारचे निवेदन 16 नगरसेवकांच्या सहीनिशी पिठासिन अधिकारी यांच्याकडे देण्यात आले.
पिठासीन अधिकार्यांनीही बहुमताने निवेदन आले असल्यामुळे यापुढील सर्व विषय मंजूर करत असल्याचे सांगून पहिल्याच विषयावर सभा संपविली. मात्र यास विरोधी नगरसेवकांनी अशा निर्णयास आमचा विरोध असल्याचे सांगत विरोध दर्शविला.
श्रीरामपूर नगरपरिषदेचे वार्षिक सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांच्या अध्यक्षतेखाली व उपनगराध्यक्ष करण ससाणे, मुख्याधिकारी गणेश शिंदे व सर्व विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडली.
यावेळी बजरंग व्यायाम शाळेची दुरुस्ती, पाणी पुरवठा योजना दुरुस्ती, भूमिगत गटार योजना याबाबतचे विषयातील चुका, तसेच इतिवृत्तात अधिकार्यांचा कामचुकारपणा दाखवत असतानाच त्याला वेगळे वळण लागले.
यावेळी नगरसेवक संजय फंड, श्रीनिवास बिहाणी, मुजफ्फर शेख यांनी भुयारी गटार योजनेची काम झालेली नसताना ठेवेदाराला पेमेंट कसे काय केले? असा सवाल करत आरोप प्रत्यारेाप केले.
त्यावर मला कोणी बॅग देऊन अथवा पाकीट देऊन विकत घेऊ शकत नाही, मी विकास कामे केली आहेत, असे विरोधकांच्या आरोपला रोखठोक उत्तर देत नगराध्यक्षा आदिक
यांनी विरोधकांच्या भुयारी गटार प्रश्नावरही सडेतोड उत्तरे दिली. त्यानंतर अनुराधा आदिक यांनी मुख्य विषयावर बोला, विषय लांबवू नका, अशी भूमिका घेतली. तेव्हा राजेंद्र पवार,
रवी पाटील, मुख्तार शहा यांच्यासह 16 नगरसेवकांच्या सह्या असलेले आजच्या सर्व विषयांना मंजुरी व आयत्यावेळच्या विषयांना मंजुरी अशी भूमिका घेत सत्ताधारी गटाने सर्व विषयांना मंजुरी दिली. तर विरोधी नगरसेवक शेख, बिहाणी, फंड यांनी तांत्रिक अडचणी दाखवून विरोध केला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम