अहमदनगर Live24 टीम, 03 नोव्हेंबर 2021 :- कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशभरात लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. याचा सकारात्मक परिणाम देखील जाणवू लागले आहे.
मात्र नुकत्याच लसीकरणाच्या मुद्द्यावरून किर्तनकार आणि प्रबोधनकार म्हणून ओळखले जाणारे निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी एक महत्वाचे विधान केले आहे.
यामुळे पुन्हा एका वादजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जाहीर कीर्तनात त्यांनी बोलताना, कोरोना झालेल्या लोकांना यम त्रास देणार नाही एवढा त्रास घरच्यांनी दिला आहे.
तसेच आपण कोरोनाची लस घेतली नाही आणि घेणारही नसल्याचं वक्तव्य त्यांनी किर्तनात केलं आहे, महाराजांच्या या भूमिकेमुळे ते पुन्हा चर्चेत आले असून त्यांना ट्रोल केले जात आहे.
महाराजांनी हे वक्तव्य स्वतः बाबतीत केले असून तसा सल्ला इतरांना दिला नसल्याचे त्यांच्या एकूण वक्तव्यावरून दिसून येत आहे. मात्र कीर्तनकार हे समाजप्रबोधनाचे काम करत असतात.
श्रोते, समर्थक,चाहते किर्तनकारांचे प्रबोधन अनुकरणीय अपेक्षित ठेवतात, त्यामुळे इंदोरीकर महाराजांनी केलेले वक्तव्य एक प्रकारे वादात सापडले आहे.
एकीकडे सरकार सर्व नागरिकांना लस घेण्याचे आवाहन करत असतांनाच दुसरीकडे भर कीर्तनात ‘मी कोरोनाची लस घेणार नाही.’ असं वक्तव्य इंदोरीकर महाराजांनी केलं आहे.
यावेळी किर्तनास आणि कार्यक्रमास उपस्थितांनी महाराजांच्या या मार्मिक पद्धतीने मांडलेल्या कोरोना विषय आणि त्यांच्या वैयक्तिक भूमिकेला हसत दाद दिली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम