अहमदनगर Live24 टीम, 05 नोव्हेंबर 2021 :- आधीच अतिवृष्टीमुळे पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे.त्यामुळे उत्पादनात खूप मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. उरल्याल्या सोयाबीनला अत्यंत कमी भाव मिळत आहे.
आणि आता चोरट्यांनी आपला मोर्चा सोयाबीनकडे वळवला आहे. जामखेड तालुक्यातील खर्ड्याजवळील मुंगेवाडी येथील शेनपट्टी शिवारात एका शेतकऱ्याचे तयार केलेले १ लाख २५ हजार रुपयांचे सोयाबीन चोरीस गेल्याने दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची वेळ येथील शेतकऱ्यावर आली आहे.
याबाबत माहिती अशी की, येथील शेतकरी विठ्ठल गोपाळघरे यांनी जामखेड पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्याद दिली आहे की, दिवसभर शेतात काम करून रात्री झोपल्यानंतर खळ्यावर केलेले २५ किंटल सोयाबीन तीस गोण्यांमध्ये झाकून ठेवले होते. परंतु याच गोष्टीचा फायदा अज्ञात चोरट्याने घेऊन रातोरात एक लाख २५ हजार रुपयांचे सोयाबीन गायब केले.
सकाळी उठल्यानंतर गोपाळघरे यांनी शेजारील खळ्यावर जाऊन पाहिले असता, सोयाबीन चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ घरच्यांना व परिसरातील शेजाऱ्यांना माहिती दिली. शेती व्यवसाय करून उपजीविका करणाऱ्या या गरीब शेतकऱ्यांना मोठा भुर्दंड बसला आहे.
मागील काळात निसर्गाचा कोप होऊन भरपूर पाऊस झाला पाण्यात व चिखलात असणारे सोयाबीन या शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने काढून झाल्यानंतर आर्थिक उत्त्पन्न सोयाबीन विकल्यानंतर त्यांना मिळणार होते
परंतु चोरट्यांनी गोण्या भरून ठेवलेल्या सोयाबीनवर डल्ला मारल्याने त्यांच्यावर मोठे संकट कोसळल्याने दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम