दिवाळसणानिमित्त दुकान लावण्याच्या कारणावरून लोखंडी पाल्याने मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 05 नोव्हेंबर 2021 :- बाजारपेठेत दिवाळसणानिमित्त दुकान लावण्याच्या कारणावरून दोन महिलांना लोखंडी पाईपने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली असल्याची घटना राहुरी शहरात घडली आहे.

दरम्यान दोन्हीही महिला गंभीर जखमी झाल्या असून राहुरीतील तीन तरुणांविरूद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुरी पोलीस ठाण्यात सौ.आशा संतोष पटारे, (वय 40 वर्षे , धंदा- भाजीपाला विक्री, रा. तनपुरेवाडी रोड, राहुरी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले, सौ.आशा पटारे यांची आई गोदाबाई शेटे या दि. 3 नोव्हेंबर रोजी शहरातील भागिरथी शाळा रोडलगत मोबाईल दुकानासमोर भाजीपाला विक्री करत होत्या.

यावेळेस आरोपी अमोल बाबासाहेब थोरात, उमेश बाबासाहेब थोरात तसेच एक पप्पू नामक तरुण हे त्या ठिकाणी आले. आणि पटारे यांना म्हणाले, तुम्ही येथे भाजीविक्री दुकान लावायचे नाही.

असे म्हणून शिवीगाळ करत होते. तेव्हा पटारे त्यांना म्हणाल्या, तुम्ही माझी आई व भावाला शिवीगाळ करू नका. असे म्हणाल्याचा आरोपींना राग आला.

त्यांनी आशा पटारे यांच्यासह त्यांच्या आईला शिवीगाळ दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी तसेच लोखंडी पाईपने मारहाण केली. या घटनेत आशा पटारे, गोदाबाई शेटे व संतोष शेटे हे जखमी झाले असून

त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पटारे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांत वरील तिघा आरोपींविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe