तब्बल 5 टन आकर्षक फुलांनी सजला शिर्डी साईंचा दरबार

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 05 नोव्हेंबर 2021 :- यंदाच्या वर्षी आंतरराष्ट्रीय देवस्थान असलेल्या शिर्डी येथील श्री साईसंस्थानच्या साईमंदिरात दीपावलीनिमीत्त आकर्षक फुलांची सजावट साईनिर्माण उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष विजय कोते यांच्या वतीने करण्यात आली आहे.

साईमंदिर तसेच मंदिर परिसरात सजावट करण्यात आलेल्या सुंदर फुलांमध्ये कार्नेशन, मधुकामिनी, कटफ्लॅावर, शेवंती, अस्तर, झेंडू, डजरोज, जलबेरा, जायसळा,सनाफ इंडिया, टिस्कॅान अशा विविध फुलांच्या प्रजाती वापरून तसेच डेकोरेटिव्ह मेटेरिअलचा वापर केला आहे.

यासाठी साधारणपणे तीन लाख रुपये खर्च आला असून 5 टन फुले लागली आहेत. यावर्षी दिवाळीनिमित्त शिर्डी येथील साईबाबा समाधीमंदिरात साईबाबांच्या आशिर्वादाने कोते पाटील परिवार व साई निर्माण उद्योग समूहाच्यावतीने साईबाबांच्या समाधी मंदिर, द्वारकामाई, गुरूस्थान, चावडी,

गणपती मंदिर, शनीमंदिर, महादेवमंदिर, दत्तमंदिर, मारूतीमंदिर तसेच चार नंबर गेट ते द्वारकामाई बाहेरील बाजूस आकर्षक व सुंदर अशा फुलांची सजावट करण्यात आली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून साईबाबांच्या दर्शनासाठी व आशिर्वादासाठी समस्त शिर्डी ग्रामस्थ व जगभरातील साईभक्त आसुसलेले असताना बाबांच्या कृपाआशिर्वादाने मंदिर सुरू झाले व सर्व साईभक्त दर्शनासाठी शिर्डीत गर्दी करू लागले,

गेल्या वर्षीची दिवाळी साईभक्तांनी व ग्रामस्थांनी मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन साध्या पध्दतीने साजरी केली मात्र यंदाची दिवाळी सर्वच साईभक्त साईबाबांच्या शिर्डीत येऊन साजरी करत आहेत. याचा सर्व शिर्डीकरांना व साईभक्तांना आनंद झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe