अहमदनगर Live24 टीम, 05 नोव्हेंबर 2021 :- देशात सध्या इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. वाढत्या महागाईमुळे जनता त्रासली आहे.
यातच आता याच मुद्द्यावरून आरोप – प्रत्यारोप सुरु झाले आहे. याच अनुषंगाने राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर चांगलाच निशाणा साधला आहे. केंद्रात काँग्रेस सत्तेवर असताना इंधन दरवाढीवरून भाजपने त्यावेळी काँग्रेस विरोधात मोठे आंदोलन उभारले होते.
आंदोलने करणारे भाजपचे नेते आता केंद्रात मंत्रीपदावर दिसून येत आहेत. यावर बाळासाहेब थोरात यांनी चफकलपणे बोट ठेवले. ते म्हणाले, काँग्रेस सरकारच्या काळात थोड्याशा इंधन दरवाढीवर आंदोलने करणारे आता कुठे लपून बसले आहेत, असा सवाल थोरात यांनी केला. केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी देशातील पेट्रोल व डिझेलवरील शुल्क कमी केली आहे.
या वरून महाराष्ट्रात ऐन दिवाळीत भाजप व महाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोपाचे राजकीय फटाके वाजू लागले आहेत. यातच राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर निशाणा साधला. ते पुढे म्हणाले, केंद्र सरकारने सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या पेट्रोल, डिझेलसह घरगुती गॅसचे दर गगनाला भिडले आहेत.
काँग्रेस सरकारच्या काळात आंदोलनातून दरवाढीचा जाब विचारणारे आता कुठे लपून बसले आहेत. पेट्रोल, डिझेल या इंधनाशी निगडीत अर्थव्यवस्थेमुळे महागाई वाढते आहे. राज्य सरकारकडून अपेक्षा जरूर ठेवा. मात्र याबाबत केंद्रालाही जाब विचारला पाहिजे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम