Ahmednagar Live Updates : जिल्हा रुग्णालयात आग ! अकरा रुग्णांचा मृत्यू !

Ahmednagarlive24 office
Updated:

Ahmednagar Hospital Fire :- अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 

रुग्णालयातील कोविड रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या अतिदक्षता विभागाचा आज सकाळी आग लागली. या विभागात एकूण 17 रुग्ण होते. यात 11 रुग्णांचा गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Last Updated On 3.38 PM – लाइव्ह अपडेट साठी पेज रिफ्रेश करा 

नगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयु वॉर्डात आज आग लागून झालेल्या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

आगीची घटना कळताच मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी तसेच मुख्य सचिव यांच्याशी बोलून तातडीने सध्या उपाचारधीन रूग्णांना उपचार मिळण्यात काही अडचणी येणार नाही ते पाहण्यास सांगितले असून जिल्हाधिकाऱ्यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा असे निर्देश दिले आहेत.

अहमदनगरमधील जिल्हा रूग्णालयाला भीषण आग लागली आहे. ही आग सकाळी 10 वाजताच्या सुमारास लागली असल्याची माहिती आहे. या आगीत 11 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत देणार

या प्रकरणाबाबत बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, “अहमदनगरमध्ये लागलेल्या आगीमध्ये 17 रूग्णांपैकी 7 रूग्णांना वाचवण्यात यश आलं आहे. यामध्ये 11 जणांचा मृत्यू झालाय. ही घटना दुर्देवी असून जखमींवर उपचार सुरु आहेत. तर मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत देण्याचा देखील निर्णय घेण्यात आलेला आहे.”

ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली आहे. एका आठवड्याच्या आत या प्रकरणाची चौकशी करून अहवाल देण्यात येण्याचे आदेश केले असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

आगीला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली जाणार

अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे तातडीने अहमदनगरच्या दिशेने निघाले

जिल्हा शासकीय रुग्णालयाला लागलेल्या आगीत काही जणांचा मृत्यू झाल्याची हसन मुश्रीफ याची माहिती

शॉर्ट सर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती, घटनास्थळी जाऊन पाहणी केली जाणार

मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईक यांना तातडीने सरकारी मदत दिली जाणार

रुग्णालयातील नर्सेस, वॉर्ड बॉय आणि डॉक्टरांच्या मदतीने रुग्णांना इतरत्र हलविण्यास सुरुवात

संपूर्ण रुग्णालयात धुराचे लोट पसरले आहेत.

रुग्णालयातील आयसीयू वॉर्डाला लागलेल्या आगीत 10 मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे

 गंभीर रुग्णांना बघून त्यांच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडायला सुरुवात केली

दरम्यान घटनास्थळी तातडीने आमदार संग्राम जगताप हे दाखल झाले आहेत

आज सकाळीच अहमदनगर शहरातील जिल्हा रुग्णालयात आग लागली आहे.यामध्ये काही रुग्ण भाजले आहेत तर काही जण दगावले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

या आगीत 10  रुग्णांचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे तर अनेक रुग्ण गंभीर जखमी झाले आहेत.

काही दिवसापूर्वीच जिल्हा शल्य चिकित्सक गाडीला आग लागली होती आता थेट आय.सी.यु विभागालाच आग लागल्याने खळबळ उडाली आहे.

दरम्यान आग विझवण्यासाठी अहमदनगर महानगरपालिकेचं अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झालं असून आग विझविण्याचे काम सुरु आहे.

पहा व्हिडीओ –

महत्वाची सूचना – ही बातमी आताच ब्रेक झाली आहे याबाबत सविस्तर वृत्त थोड्याच वेळात अपडेट केले जाईल यासाठी हे च पेज रिफ्रेश करा

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe