maharashtra weather news : 10 जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा !

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 06 नोव्हेंबर 2021 :- आज आणि उद्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.हवामान खात्याने आज पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आज पुण्यासह, नाशिक, अहमदनगर, सातारा, सांगली, ठाणे, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दहा जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.

आज सकाळपासूनच संबंधित जिल्ह्यात ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे.पुढील काही तासांत संबंधित जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान याठिकाणी 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

तसेच लांबचा प्रवास टाळण्याचा सल्लाही हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.आज मुंबई, पालघर, बीड, लातूर, सोलापूर, उस्मानाबाद या जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आज सकाळपासूनच या जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली असून मागील चोवीस तासांत मुंबईत 10 मीमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

उद्या राज्यात पावसाचा जोर काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता असून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांनाच येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe