अहमदनगर Live24 टीम, 08 नोव्हेंबर 2021 :- काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी कन्याकुमारी येथील सेंट जोसेफ मॅट्रिक उच्च माध्यमिक विद्यालयातील विझिटर्ससोबत दिवाळी साजरी केली.
यादरम्यानच्या एका संभाषणाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत ही दिवाळी छान साजरी झाल्याचं त्यांनी म्हटलं. याचवेळी संभाषणादरम्यान, पंतप्रधान झालात तर पहिला कोणता निर्णय घ्याल, असा प्रश्न राहुल गांधींना विचारण्यात आला.

यावेळी त्यांनी क्षणाचीही विलंब न लावता ‘महिलांना आरक्षण देईन’, असं तत्काळ उत्तर दिलं. “जर मला कोणी विचारले की तुम्ही तुमच्या मुलांना काय शिकवाल, तर मी विनम्रता शिकवेन.
कारण विनम्रता ही अशी गोष्ट आहे की त्यामुळे तुम्हाला समज यायला मदत होते”, असंही राहुल गांधी म्हणाले. राहुल यांना भेटण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळातील एका सदस्याने राहुल आणि प्रियांकाच्या शेतकरी संघर्षातील सहभागाचे कौतुक केले.
यातून तुमची लोकांशी असलेली एकजूट दिसून येते, अशा शब्दात त्यांनी राहुल गांधी आणि प्रियांकांचं कौतुक केलं. रात्रीच्या जेवणाची वेळ असल्याने,
राहुल गांधींना त्यांच्या तामिळनाडूतील मित्रांसाठी काही खास दिल्लीच्या जेवणाची व्यवस्था करायची होती आणि त्यांनी छोले भटुरे आणि कुल्फी मागवली. सेंट जोसेफ मॅट्रिक हायर सेकंडरी स्कूल, मुलुगुमुडू,
कन्याकुमारी (तामिळनाडू) येथील मित्रांसोबतचे संभाषण आणि रात्रीच्या जेवणाप्रसंगीचे काही क्षण राहुल गांधींनी ट्विट केले. “मित्रांच्या भेटीने दिवाळी आणखी खास बनली.
संस्कृतींचा हा संगम आपल्या देशाची सर्वात मोठी ताकद आहे आणि ती आपण जपली पाहिजे”, असं राहुल गांधी म्हणाले. ही तीच शाळा आहे ज्या शाळेला राहुल गांधींनी मार्च महिन्यात भेट दिली होती.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम