प्रवाश्यांनी अंबानींच्या घराचा पत्ता काय विचारला…‘अँटिलिया’ बाहेरील पोलीस बंदोबस्त वाढवला

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 08 नोव्हेंबर 2021 :- देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबांनींच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मुंबई पोलिसांना एका टॅक्सी चालकाने दिलेल्या एका महितीनंतर अँटिलियाच्या आजूबाजूला पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आल्याची माहिती मिळते आहे.

काही दिवसांपूर्वीच अंबानी यांच्या अँटिलिया या निवास्थानाबाहेर एक स्कॉर्पिओ आढळून आली होती. त्यामध्ये, जिलेटीन कांड्याही सापडल्या होत्या. त्यानंतर, या प्रकरणाला वेगळंच वळणं लागलं. त्यामध्ये मुंबई पोलीस दलातील एक अधिकारीच सहभागी असल्याचं उघड झालं.

त्यानंतर, आता पुन्हा एकदा अंबीनींच्या घराबाहेर काही संसशास्पद हालचाली झाल्याचे समजते. मुकेश अंबानींच्या घराचा पत्ता विचारत काही व्यक्तींनी त्यांच्या घराजवळील परिसरात आगमन केले आहे.

आम्हाला एका टॅक्सी ड्रायव्हरचा फोन आला. त्यावेळी, टॅक्सीमध्ये बसलेल्या दोन प्रवाशांनी मुकेश अंबानींच्या अँटिलीया या घराचा पत्ता विचारला होता. त्या प्रवाशांकडे दोन बॅगा होत्या, असे टॅक्सी ड्रायव्हरने पोलिसांना फोन करुन सांगितले आहे. त्यामुळे, मुंबई पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे.

या प्रकरणामध्ये आम्ही चालकाने दिलेली माहिती पडताळून पाहत आहोत, असं पोलिसांनी म्हटलं आहे. मात्र हा फोन कॉल आल्यानंतर येथील सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली असून अनेक ठिकाणी बॅरीकेड्स लावण्यात आले आहेत. या ठिकाणी पोलीस कसून तपास करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News