चक्क काही नातेवाईकांनी आपल्या पेशंटला बांधून ठेवल्याने त्यांचा तरफडून मृत्यू

Ahmednagarlive24 office
Published:

 

अहमदनगर Live24 टीम, 08 नोव्हेंबर 2021 :- अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातील कोव्हिडच्या आयसीयू वॉर्डला आग लागली. ही आग शॉक सर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आयसीयू वॉर्डात 17 रुग्ण उपचार घेत होते.

या आगीत आतापर्यंत 11 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. आता हळूहळू याप्रकरणी एक एक धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे.

ही आग कशामुळे लागली याबाबतचे चित्रीकरण सीसीटीव्ही फुटेजमध्ये झाले असले तरी जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता.

त्यानंतर हा जो महत्त्वाचा वॉर्ड आहे. याठिकाणी फक्त एकच महिला कर्मचारी उपस्थित असल्याचं दिसून येत आहे. तर काही रुग्णांच्या नातेवाईकांनी आपल्या पेशंटला बांधून ठेवले असल्यामुळे त्यांना बाहेर पडता आले

नाही व ते तडफडून मेले असाही आरोप केला आहे. ज्या महिला कर्मचाऱ्यांची याठिकाणी शनिवारी नियुक्ती होती ती महिला कर्मचारी आलीच नसल्याचं उघड झाले आहे.

कंत्राटी कामगारांच्या भरोश्यावर सध्या जिल्हा रुग्णालय सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुर्घटनेबाबत शोकसंवेदना व्यक्त केली असून, दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश त्यांनी दिले आहेत.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून, घटनेला जे जबाबदार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.