अहमदनगर Live24 टीम, 09 नोव्हेंबर 2021 :- जिल्हा रुग्णालयातील आयसीयूत लागलेल्या आगीत ११ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणावरून राज्यात मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. याच अनुषंगाने प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला होता.
जिल्हा रुग्णालय अग्निकांड प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक आणि एक स्टाफ नर्सेसना निलंबित करण्यात आले आहे, तर यामध्ये दोन नर्सेसची सेवा समाप्त करण्यात आली आहे.
त्यामुळे आता नर्सेसमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आम्हाला सर्वांनाच निलंबित करा. आमची काय चूक ? अग्निशामक यंत्रणा बसवणे हे काय आमचे काम आहे का ?असा सवाल यावेळी नर्सेस यांनी केला आहे.
आता यामुळे पुन्हा एक मोठे संकट प्रशासनासमोर येऊन ठाकले आहे. दरम्यान नगर शहरातील जिल्हा रुग्णालयातील सर्व नर्सेस काम सोडून बाहेर आल्या असून
आम्हाला आता निलंबित केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आम्हाला निलंबित करा किंवा त्यांचे तरी निलंबन मागे घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम