अहमदनगर Live24 टीम, 09 नोव्हेंबर 2021 :- विधानसभा निवडणुकीच्या काळात पावसाची सभा निर्णायक ठरली होती. तशी आजची ही पावसाची सभा कर्जत नगरपंचायतीसाठी निर्णायक ठरेल, असा विश्वास आहे.
आज या पावसात आपला नंबर लागला ते आपले भाग्य समजतो, असे प्रतिपादन खासदार सुजय विखे यांनी केले. दिवाळीच्या काळात कर्जतमध्ये राजकीय फटाके फुटले तर काही ठिकाणी आतषबाजी देखील झाल्याचे कर्जतकरांना पाहायला मिळाले.
ही आतषबाजी, फटाक्यांचा आवाज राजकीय वर्तुळात येणाऱ्या नगर पंचायत निवडणुकीची चाहूल असल्याचे दिसत आहे. िदवाळी पाडव्याला माजीमंत्री राम शिंदे यांनी आपल्या संपर्क कार्यालयाचे कर्जत शहरात उद्घाटन खासदार डॉ. विखे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्या हस्ते केले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात पावसात विखे आणि शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. खासदार विखे म्हणाले,
सध्या कर्जत- जामखेड मतदारसंघात व्यक्ती स्वातंत्र्यावर दबावतंत्र वापरून पक्षांतर करण्याचे काम चालू आहे. लोकांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर दबाव टाकून स्वार्थ साधला जात आहे,
असा टोला नाव न घेता आमदार रोहित पवार यांना लगावला. यासाठी आगामी काळात व्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राहायचे असेल राम शिंदे यांच्याशिवाय पर्याय नाही, असे ते म्हणाले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम