नगर अर्बन बँकेच्या चार जागा बिनविरोध तर १४ जागांसाठी निवडणूक होणार

 

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2021 :- नगर अर्बन बँकेच्या चार जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर उर्वरित 14 जागांसाठी निवडणूक लागली असून त्यासाठी 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंंगणात आहे.

बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीसाठी शुक्रवारी शेवटचा दिवस होता. 87 जणांचे अर्ज शिल्लक होते. त्यातील बँक बचाव कृती समितीच्या 22 जणांसह 66 जणांनी निवडणूकीतून माघार घेतली.

दरम्यान, निवडणुकीच्या आखाड्यातून बँक बचाव समितीने माघार घेतल्याने बँकेवर सहकार पॅनलची (गांधी गट) सत्ता येणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. यामुळे सहकार पॅनलच्या (गांधी गट) चार जागा बिनविरोध झाल्या.

या चार जागा बिनविरोध
संगीता दिपक गांधी, मनेष दशरथ साठे, मनिषा रवींद्र कोठारी व दिनेश पोपटलाल कटारिया या चार जागा बिनविरोध झाल्या आहेत.

दरम्यान मनपा व भिंगार कॅन्टोन्मेंट हद्दीतील रहिवासी मतदार संघ (सर्वसाधारण) 10 जागांसाठी 14 उमेदवार आणि मनपा व भिंगार कॅन्टोन्मेंट हद्दीतील कार्यक्षेत्र वगळून महाराष्ट्र राज्य मतदार संघ (सर्वसाधारण) 4 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात राहिल्याने या जागेसाठी निवडणूक होणार आहे.