अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2021 :- एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याच्या मुलाच्या दिशेने गोळीबार करून त्याच्या हातातील सुमारे नव्वद हजार रुपयांची बॅग लांबविल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात घडली आहे.
या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, नेवासा -खडका रस्त्यावर मुथा बंधू यांचे दोन बंगले असून त्याच ठिकाणी त्यांची मासफूड प्रॉडक्ट लिमिटेड कंपनी आहे.
सायंकाळी साडेसहा वाजता नीरज अभय मुथा हा कंपनीतून घराकडे पैश्याच्या बॅगा घेऊन जात असताना रस्त्याच्या समोरील झाडीतून दोघे आले व त्यांनी नीरजवर पिस्तुल रोखले.
या हल्लेखोरांनी नीराजच्या हातातील बॅगा हिसकावण्याचा प्रयत्न करत असताना नीरजचा होत असलेला विरोध पाहून पिस्तुलधारी हल्लेखोराने त्याच्या दिशेने गोळी झाडली.
दरम्यान त्याच्या हातातील एक बॅग घेऊन हल्लेखोर पळ काढत असताना दुसर्या साथीदाराने पुन्हा एक गोळी लोड केली. परंतु नीरज त्यांच्यामागे धावल्यावर चोरट्यांनी सोबत असलेल्या साथीदारांच्या मोटारसायकलीवर पळ काढला.
सदर सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झाली आहे. घटनेची माहिती कळताच पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार व त्यांच्या साथीदारांनी घटनास्थळी धाव घेतली. मुथा कुटुंबियांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम