बोगस दाखल्याच्या आधारे लष्करात भरती झालेल्या तरुणाला पोलिसांकडून अटक

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2021 :- बनावट रहिवासी दाखला तयार करून त्या आधारे लष्करात भरती झालेल्या तरुणाला भिंगार कॅम्प पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी लष्कराच्या बीएमआर रेजिमेंटचे अधिकारी साई स्वरुप जेना (वय 45) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यानुसार सचिन ओमपाल (वय 19 रा. बाडी, ता. सिदौली, जि. सीतापूर, उत्तर प्रदेश) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि,

आरोपी ओमपाल हा ऑक्टोबर 2020 मध्ये उत्तर प्रदेश येथे सैन्यदलात भरती झाला होता. त्याची प्रारंभी बरेली (उत्तरप्रदेश) व नंतर नगरच्या डीएमआर रेजिमेंटमध्ये नियुक्ती झाली होती.

लष्करात भरती होत असताना तो बाडी (ता. सिदौली) या गावचा रहिवासी असल्याचे सांगून बनावट कागदपत्रे दिली होती. दरम्यान लष्कराने केलेल्या

तपासणीत तो बाडी गावचा रहिवासी नसून त्याने बनावट रहिवासी दाखला सादर केल्याचे निष्पन्न झाले. सैन्य दलाची फसवणूक केल्यामुळे ओमपालविरोधात कॅम्प पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe