अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2021 :- केंद्र सरकारच्या अहमदनगर महत्त्वाकांक्षी सुरत हैदराबाद महामार्गाचे कामासाठी हालचाली सुरू आहेत. त्यासाठी जमीन अधिग्रहणासाठी कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.
राहुरी तालुक्यातील १९ गावांमधून हा महामार्ग जाणार आहे. या गावातील जमीन अधिग्रहणासाठी भूसंपादन उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांनी अधिसूचना प्रसिद्ध करण्याचे नियोजन केले आहे.
राहुरी तालुक्यातील धानोरे, सोनगाव ,माळेवाडी – डुक्रेवाडी, कानडगा, तांदुळनेर, तांभेरे, वडनेर ,कनगर खुर्द, कनगर बुद्रुक, चिंचविहिरे, मल्हारवाडी, मोमीन आखाडा, राहुरी बुद्रुक, राहरी खर्द, डिग्रस, सडे,
खडांबे बुद्रुक, खडांबे खुर्द, वांबोरी या गावांमधून हा महामार्ग जाणार आहे. केंद्र शासनाने राजपत्रात अधिसूचना यापूर्वीच प्रसिद्ध केली आहे. लवकरच जमिनी ताब्यात घेऊन त्यावर रस्त्याचे काम सुरू होणार आहे.
राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बागायती व जिरायती जमिनी, पक्की व कच्ची घरे, विहिरी, गोठे, छोटी मोठी झाडे जाणार आहेत. काही जमिनींचे निश्चितीकरण व वाद देखील आहेत.
एनएचएआयद्वारा मोबदलाही दिला जाणार आहे. मात्र राहुरी तालुक्यातील सर्वांधिक १९ गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी या महामार्गात जाणार असल्याने हायवेचे नकाशे, जाणारे क्षेत्र, सर्व्हिस रोड,
हरकती याबाबत राहुरी तहसील कार्यालयात विशेष कक्ष तात्काळ स्थापन करण्याची मागणी केली जात आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी सुलभ होणार आहे.
दरम्यान, भूसंपादन अधिकारी तथा प्रांताधिकारी यांच्या कार्यालयाने २१ नोव्हेंबरपर्यंत हरकती मागवल्या आहेत. त्यामुळे हा कक्ष तात्काळ स्थापन करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम