अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2021 :- सर्व समाज घटकांचा विचार करत शासन काम करत आहे. जनतेने ही शासनाला पाठबळ देण्याची गरज आहे. थकीत वीज बीले भरली पाहिजेत, पाण्याचा अपव्यय टाळला पाहिजे.
पवार पुढे म्हणाले, ऊसाला जास्तीत भाव मिळावा यासाठी शासन साखर कारखानादारांशी चर्चा करत आहे. शेती उत्पादनाला चांगला भाव मिळण्यासाठी मार्केट कमिट्या मजबूत झाल्या पाहिजेत.
एस.टी. कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. मात्र प्रवाशी हिताचा पण विचार झाला पाहिजे. अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी मार्गदर्शन केले.
जामखेड शहर व तालुक्यातील विविध विकासकामांचा एकत्रित भूमिपूजन उपमुख्यमंत्री ना. पवार यांच्या हस्ते झाले. पवार पुढे म्हणाले, राज्यात केंद्र व राज्याच्या माध्यमातून रस्ते विकासाची अनेक कामे सुरू करण्यात आली आहेत.
आमदार निधी 4 कोटी करण्यात आला आहे. जिल्हा नियोजन मंडळांना शंभर टक्के निधी देण्यात आला आहे. तसेच शेतकरी कर्जमाफी, नैसर्गिक संकटात आपत्तीग्रस्तांना मदत,
करोनाचा मुकाबला करण्यासाठी भरघोस निधींच्या माध्यमातून राज्याने काम केले. शेतकर्यांना 3 लाखापर्यंत कर्ज शून्य टक्के व्याज दराने देण्याचा निर्णय घेण्यात आला. रस्ते कामासोबत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यावर भर देण्यात आला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम