अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2021 :- गेल्या काही दिवसांपासून राज्य परिवहन महामंडळ कर्मचार्याचे शासनात विलिगिकरण व इतर मागण्यासाठी आंदोलन सुरु आहे. एस. टी. कर्मचारी संपावर आहेत.
यामध्ये अकोले डेपोचे कर्मचारीही सहभागी असून आज अकोले एस. टी. महामंडळाच्या कर्मचार्यांनी शहरातून मोर्चा काढून तहसील कार्यालयात तहसीलदार यांना निवेदन दिले.

यावेळी डॅा. अजित नवले, जिल्हा परिषद सदस्य व गटनेते जालिंदर वाकचौरे, संभाजी ब्रिगेडचे डॅा.संदिप कडलग, भाजपा तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष राहुल देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे,
प्रियंका चासकर (छात्र भारती संघटना, अकोले), शशिकांत केदार, व्यापारी संघटनेचे अनिल भळगट, चंद्रकांत सरोदे, अनिल झोळेकर आदी उपस्थित होते. तसेच यावेळी भाजपा, मनसे, माकप आदी पक्षाचे पदाधिकारी व नेत्यांनी एस टी कर्मचार्यांचे आंदोलनास जाहिर पाठिंबा दिला.
अकोले आगारातून निघालेला हा मोर्चा घोषणा देत तहसील कार्यालयाचे गेटवर येऊन तेथे सभा झाली. यावेळी बोलताना माकपचे राज्यसचिव डॉ. अजित नवले म्हणाले,माणुसकीच्या व माणवतेच्या नात्याने आम्ही तुमच्यासोबत आहोत.
दरवेळी तुम्ही पगारवाढ, बोनस मागत होता ते तुम्हाला देत होते. मात्र यावेळी तुम्ही अचूक ठिकाणी घाव घातला आहे. त्यांना कोंडीत पकडले आहे. राज्यातील सर्व विभागातील कामगारांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दत्ता नवले यांनी तर सरकारने लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा आमदार, खासदार व मंत्र्याना रस्त्यावर फिरू देणार नाही व त्याच्या गाड्या फोडू. एस. टी. कर्मचार्यांनो आता तुम्ही आत्महत्या करु नका, आत्महत्या या राज्यकर्त्याना करावी लागेल, अशी वेळ आणू, असा इशारा दिला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम













