खासदार सुजय विखे म्हणाले… मी कुणाला खातच नाही अन् कुणाला मोजतही नाही

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2021 :- नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एका आयोजित कार्यक्रमात सुजय विखे यांनी पंकजा मुंडेंवर स्तुतीसुमने उधळली. तसेच, मोनिकाताई म्हणाल्या तुम्ही आमच्या मनातल्या, मी म्हटलं मुख्य लावू नका पुन्हा त्यांची अडचण.

मला काही फरक पडत नाही, कारण मी कुणाला खातच नाही अन् कुणाला मोजतही नाही, असे सुजय विखे यांनी म्हटले. विखेंच्या बोलण्याचा रोक नेमका कोणाकडे होता, अशी चर्चा आता रंगली आहे.

यावेळी बोलताना खासदार सुजय विखे म्हणाले कि, पंकजा मुडेंमुळेच आपण खासदार असल्याचं म्हटलं. तुम्ही माझ्या प्रचाराला आलात आणि तुमच्या आशीर्वादामुळेच मी खासदार झालो.

मी जेव्हा ताईंकडे गेलो होतो, तेव्हा मला एबी फॉर्मही मिळाला नव्हता. फक्त माझा भाजपात प्रवेश झाला होता. त्यावेळी, ताईंनी मला विश्वास दिला, तू माझ्या भावासारखा आहे, असं त्या म्हणाल्या.

यावेळी पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हंटले कि, आताच्या घडीला राजकारण हे पोरखेळ वाटायला लागले आहे. राज्यात बिगबॉसचा शो सुरू आहे की काय? अशी शंका येते.

आरोप-प्रत्यारोपांमध्ये विकासाचा मुद्दा बाजूला पडला आहे. दुसरीकडे दाऊत, अंडरवर्ल्ड, ड्रग्ज माफिया हे सर्व विषय पुढे येत आहे. हे राज्याचे दुर्दैव आहे,

अशी टीका करत हे सर्व महाराष्ट्रात कोण आणते असा प्रश्न विचारला जात नाही. याला आळा घालण्याचे काम हे सत्ताधारी पक्ष आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांचे आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News