नगर शहरात चोरीचे सत्र सुरूच… बंद घरावर चोरटयांनी साधला डाव

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2021 :- नगर शहरात चोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाही आहे. यामुळे नागरिकांमध्ये कमालीची भीती आणि दहशत निर्माण झाली आहे. नुकतेच शहरातील सारासनगर येथे एक ठिकाणी चोरीची घटना घडली आहे.

शहरातील सारसनगर येथील ओम कॉलनी येथे राहत असलेले भंडारी यांच्या घराचे दरवाजे तोडून मोठी चोरी झाली आहे भंडारी परिवार दिवाळी सुट्टी निमित्त राजस्थानला गेले होते आज ते सकाळी नगरला आपल्या घरी आले असता

घराचे सेंटर लॉक तोडल्याचे त्यांना आढळून आले. दरम्यान चोरट्यांनी घरातील कपाट उचलून शेजारील शेतात नेऊन त्यातील पैसे सोने चांदी च्या वस्तू लंपास केल्या.

या कपाटामध्ये चार तोळे सोने व सत्तर हजार रुपये तसेच काही चांदीच्या वस्तू चोरीस गेल्या आहेत. घटनास्थळी भिंगार कॅम्प पोलीस पथक व स्वान पथक दाखल झाले असून पुढील तपास चालू आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe