कट्टर विरोधक दिवाळी फराळ पार्टीला आले एकत्र… राजकीय तर्कवितर्कांना उधाण

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2021 :- जिल्हा बँकेेचे संचालक करण ससाणे यांनी काँग्रेसच्यावतीने आयोजित केलेल्या दिवाळी फराळ कार्यक्रमाला मुरकुटे पिता-पुत्र व शिवसेनेचे खा. सदाशिव लोखंडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी हजेरी लावली.

यावेळी दोघांनीही फराळाचा आस्वाद घेतला. आगामी नगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने या फराळाची ‘गोड’ चर्चा शहरात सुरू झाली आहे. माजी आ. स्व. जयंतराव ससाणे व माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्यातील राजकीय संघर्ष तालुक्याने जवळून पाहिला आहे.

मात्र गेल्या एक ते दीड वर्षापासून ससाणे-मुरकुटे यांच्यातील संघर्ष हळूहळू मावळताना पहायला मिळत आहे. त्यानंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी उपनगराध्यक्ष करण ससाणे व माजी आ. भानुदास मुरकुटे या दोघांनाही बिनविरोध संचालक करण्यात महत्वाची भूमिका बजावून या नव्या मैत्रीची रेशिमगाठ बांधली.

दरम्यान नगरपरिषद निवडणुकीत ससाणे-मुरकुटे एकत्र येणार? अशी चर्चा रंगली असताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठनेते शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्फत आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी काम करण्याचा निरोप मुरकुटे यांना पाठविला.

दरम्यान ससाणे यांच्या या दिवाळी फराळ कार्यक्रमाला शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनीही हजेरी लावली. माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्या समवेत त्यांनीही फराळाचा आस्वाद घेतला. माजी आमदार भानुदास मुरकुटे व खा. सदाशिव लोखंडे यांच्या दिवाळी फराळ कार्यक्रमाच्या हजेरीची चर्चा शहरात सुरु होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe