अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2021 :- पुणे ग्रामीण भागात कलम १४४ म्हणजेच जमावबंदी लागू करण्याची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.
अमरावती, नांदेड, मालेगाव येथील हिंसाचाराचे लोण पुणे ग्रामीणमध्ये पोहोचू नये यासाठी जिल्हा प्रशासनाची खबरदारी घेतली आहे.

याबाबत पुणे ग्रामीण अधीक्षक कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांना कलम १४४चा प्रस्ताव दिला होता. त्रिपुरा राज्यातील हिंसाचार प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्राच्या काही भागात उमटले.
या वेळी मालेगाव, नांदेड आणि अमरावतीत पुकारण्यात आलेल्या बंदला काही समाजकंटकांमुळे हिंसक वळण दिले.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुणे जिल्ह्यात जमावबंदी लागू केली आहे. पुणे ग्रामीण भागात कलम १४४ म्हणजेच जमावबंदी लागू करण्याची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.
अमरावती, नांदेड, मालेगाव येथील हिंसाचाराचे लोण पुणे ग्रामीणमध्ये पोहोचू नये यासाठी जिल्हा प्रशासनाची खबरदारी घेतली आहे.
याबाबत पुणे ग्रामीण अधीक्षक कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांना कलम १४४चा प्रस्ताव दिला होता.
पुण्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या प्रस्तावाला मान्यता देत जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी लागू केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम