अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2021 :- दोन दुचाकींच्या भीषण अपघातात दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना कर्जत तालुक्यातील चिंचोली फाटा येथे घडली आहे.
या अपघातात अक्षय आंधळे, रा. कडा व सुनिल राऊत, रा. पारेवाडी हे गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत सामाजिक कार्यकर्ते सुनिल यादव यांना घटनेची माहिती होताच त्यांनी खासगी ॲम्ब्युलन्समधून जखमींना कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात हलवले.
तर शंकर लष्कर, भाऊसाहेब कोळेकर व इतरांनी जखमींना तात्काळ मदत केली. अपघातातील दोघेही गंभीर जखमी असून ते बेशुद्ध अवस्थेत आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथे नेण्याचे डॉक्टरांकडून सुचविण्यात आले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम