अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2021 :- श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापतिपदासाठी 18 नोव्हेंबर 2021 रोजी निवडणूक होणार आहे. तत्पूर्वी संगीता शिंदे यांनी जिल्हाधिकार्यांनी घोषित केलेली सभापतिपदाच्या निवडणुकीला स्थगिती मिळावी, यासाठी उच्च न्यायालयात याचिका सादर केली होती.
मात्र ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, संगीता सुनील शिंदे यांनी पक्ष आदेशाचे पालन न केल्याने अपात्रतेची कारवाई करावी
या आशयाची याचिका डॉ.वंदना मुरकुटे यांनी जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे दाखल केली होती. यात जिल्हाधिकार्यांनी वंदना मुरकुटे यांच्या बाजूने निर्णय दिला होता.
त्यामुळे सौ. वंदना मुरकुटे यांच्या सभापतीपदाच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी श्रीरामपूर पंचायत समिती सभापतिपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला.
सदर निवडणुकीचा कार्यक्रम स्थगित करावा अशा आशयाची याचिका शिंदेंनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. मात्र शिंदेंची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
तसेच सभापती पद हे ओबीसी महिलेकरिता आरक्षीत असल्यामुळे डॉ. वंदना मुरकुटे या एकमेव ओबीसी महिला सदस्य असल्यामुळे जवळपास त्यांची निवड निश्चित मानली जात आहे. केवळ सोपस्कार म्हणून सदरची निवडणूक गुरुवार दि. 18 नोव्हेंबर 2021 रोजी होत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम