अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2021 :- गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. यामुळे लालपरीचे चाक थांबलेली आहे. दरम्यान एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या प्रमुख मागणीसाठी एसटी कामगारांनी कुटुंबियांसह पाथर्डी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता.
एसटीचे राज्य सरकारमध्ये विलनीकरण झालेच पाहिजे, अशा घोषणा देत मोर्चा तहसील कार्यालयावर जाऊन धडकला. यावेळी एसटी कर्मचार्यांसह कुटुंबियांनी शहरातील बाजारपेठेत फिरून बंद ठेवण्याचे आवाहन केले होते.
त्यांच्या आवाहनाला बहुसंख्य व्यापार्यांनी पाठिंबा दिला. सोमवारी सकाळी कर्मचार्यांनी कुटुंबियांसह नवीन बस स्थानकापासून मोर्चाला सुरुवात केली. जुने बसस्थानक मार्गे मोर्चा तहसील कार्यालयावर गेला.
यावेळी विविध पक्षातील नेते ,कार्यकर्त्यांनी पाठिंबा देत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. सरकारचा निषेध व्यक्त करत कर्मचार्यांचा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी केली.
ग्रामीण भागात शेवटच्या माणसापर्यंत एसटी जाते. गोर गरिबांची नाळ एसटी बरोबर जोडलेली आहे. या सर्व बाबींचा सरकारने विचार करावा, अन्यथा भविष्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांच्या वतीने देण्यात आला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम