अहमदनगर ब्रेकिंग : संपत्तीच्या वादातून रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार !

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :-  काष्टी येथील संजीवनी हाॅस्पीटल मसमोर दोघा भावांची मारामारी झाली. मनोज मुनोत याने पाईप मारला. त्यावर डॉ. विजय मुनोत याने आपल्या रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केला.

या गोळीबारात मनोज मुनोत यांना एक गोळी लागली आहे. ही घटना बुधवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत मनोज मुनोत व डॉ. विजय मुनोत दोघेही जखमी झाले आहेत.

घटनास्थळास पोलिस निरीक्षक रामराव ढिकले सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर यांनी भेट दिली. डॉ. विजय मुनोत यांनी मनोज मुनोत यांच्यावर रिव्हॉल्वरमधून दोन गोळ्या झाडल्या असून एक गोळी मांडीला तर दुसरी गोळी पोटाला लागली आहे.

मनोज मुनोत यांना उपचारासाठी दौंड येथील पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते मात्र प्रकृती खालावल्याने पुणे येथे उपचारासाठी पाठवावे असे पाटील हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले आहे.

काष्टी येथे विजय मुनोत यांचा वैद्यकिय व्यावसाय आहे तर मनोज मुनोत यांचा किराणा विक्रीचा व्यावसाय आहे. डॉ. विजय मुनोत यांचे हॉस्पीटल असून त्याच्याच समोर मनोज मुनोत यांचा किराणा विक्रीचा व्यावसाय आहे.

बुधवारी सकाळी साडेदहाच्या दरम्यान मनोज मुनोत यांच्या दुकानात विक्रीचे साहित्य घेऊन एक टेम्पो आला होता. टेम्पो चालकाने सदर टेम्पो डॉ. मुनोत यांच्या हॉस्पीटलसमोर उभा केला होता.

टेम्पो माझ्या दवाखान्यासमोर का उभा केला असले म्हणून डॉ. विजय मुनोत यांनी मनोज मुनोत यांच्यासोबत वाद घालण्यास सुरूवात केली. त्यानंतर दोन्ही भावांमध्ये झटापट झाली.

याचवेळी मनोज मुनोत यांनी डॉ. विजय मुनोत यांच्या डोक्याला मारहाण केल्याने ते जखमी झाले तसेच डॉ. विजय मुनोत यांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने मनोज मुनोत यांच्यावर गोळीबार केला.

एक गोळी मनोज मुनोत याच्या मांडीत घुसली. मनोज मुनोत याला एक गोळी लागली. मनोज मुनोत याच्या मांडीत गोळी घुसली आहे. मनोज मुनोत याला उपचारासाठी दौंडला हलविण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe