विहिरीत पाणी आहे परंतु वीज मिळत नसल्याने शेतकरी झाले हतबल

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :- पाथर्डी तालुक्यातील करंजीमधील मिरी परिसरातील गावांमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून शेती पंपाच्या विजेचा तांत्रिक बिघाड झालेला आहे.

यामुळे संतप्त शेतकर्‍यांनी मिरी सबस्टेशनसमोर धरणे आंदोलन केले. यावेळी शिराळचे उपसरपंच हनुमंत घोरपडे, गितेवाडीचे सरपंच भाऊसाहेब पोटे,

डमाळवाडीचे सरपंच रामनाथ शिरसाठ यांच्यासह सुमारे 30 ते 40 शेतकर्‍यांनी सबस्टेशनसमोर धरणे आंदोलन केले. या भागातील शेती पंपाचा वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी महावितरणच्या अधिकार्‍यांकडे लेखी निवेदन देऊन केली.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शिराळ, चिचोंडी, कोल्हार परिसरात शेती पंपाची वीज पूर्ण दाबाने मिळत नाही. विहिरीत पाणी आहे परंतु वीज मिळत नसल्याने मोठी गैरसोय होत आहे.

पूर्णदाबाने वीज मिळत नाही. त्यामुळे इलेक्ट्रिक मोटर स्टार्टर खराब होत आहे. महावितरणकडून अर्ध्या रात्री शेती पंपाचा वीजपुरवठा सुरू केला जातो.

मात्र वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. महावितरणने रात्रीच्यावेळी नव्हे तर दिवसाला शेतीसाठी वीजपुरवठा सुरू करावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News