काळे – कोल्हे यांनी एकत्र येऊन कोपरगावचा पाणी प्रश्न सोडविण्याची मागणी

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :- सुमारे तीस चाळीस वर्षांपासून प्रलंबित असलेला कोपरगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कोपरगाव चे आजी माजी आमदार काळे कोल्हे यांनी सोडवावा असे कळकळीचे आवाहन लोक स्वराज्य आंदोलनाचे अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की कोणतीही निवडणूक आली की कोपरगाव शहराचा पिण्याच्या पाण्यावर व तालुक्याच्या शेतीच्या पाण्यावर लढवली जाते कधी काळी हक्काच्या 11 टीएमसी पाण्याचा लढा माजी खा. शंकररावजी साहेब यांनी उभारला होता.

त्यात माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी नेहमीच सहकार्य केले. पूर्वी सुजलाम सुफलाम असलेला कोपरगाव तालुका महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जायचा व या तालुक्यात सहा साखर कारखाने अस्तित्वात असलेला एकमेव तालुका होता मात्र हळूहळू वाढती लोकसंख्या, वाढते शहरी करण,

वाढते औद्योगिकरण यातून पाणी कमी झाले आणि शेती बरोबरच पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला सुमारे 35 वर्षांपूर्वी कोपरगाव शहरात अभूतपूर्व पाणी टंचाई निर्माण झाली आणि रेशनकार्ड वर पाणी देणारी नगर पालिका म्हणून जागतिक दर्जाच्या बीबीसी चॅनल ने दखल घेतली मात्र यातून दुर्दैवाने कोणीही बोध घेतला नाही.

मागील विधान सभा निवडणुकी नंतर माजी आ. स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नांची गांभीर्याने दखल घेत निळवंडे ते शिर्डी या पाणी पुरवठा योजनेतून पाणी मिळावे म्हणून कोपरगाव पर्यंत वाढीव पाणी पुरवठा योजनेला तांत्रिक मंजुरी मिळवली त्यास शिर्डी येथील साईबाबा संस्थान मदत करणार होते.

मात्र दोन वर्षांपूर्वी सत्तांतर होऊन आमदार म्हणून आशुतोष काळे निवडून गेले त्यानी देखील त्यांच्या परीने प्रयत्न करून पाच नंबर तळ्या साठी तांत्रिक मंजुरी मिळवली कोपरगाव शहरासाठी दोन योजना मंजूर करताना एका पाणी योजनेवर पाणी सोडावे लागेल अशी अट टाकण्यात आली.

मात्र त्यामुळे पुन्हा एकदा कोपरगाव शहरातील नागरिकांचे तोंडचे पाणी पळाले असून काळे- कोल्हे कुटुंबीय नेहमीच कोपरगाव तालुक्याच्या चांगल्यासाठी एकत्र येतात मग महापूर, दुष्काळ,कोविड सारखी साथीच्या आजारात या दोन्ही कुटूंबियांनी राजकीय मतभेद बाजूला ठेऊन राज्याच्या राजकारणाला एक आदर्श घालून दिला असून आता देखील गेल्या अनेक वर्षांपासून कोपरगाव शहरातील जनतेला मुबलक व स्वच्छ पाणी मिळावी ही जनतेची माफक अपेक्षा आहे .

माजी आ. स्नेहलताई कोल्हे व विद्यमान आ आशुतोष काळे यांनी कोपरगावचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी त्यांच्या परीने प्रयत्न केलेच आहे. सध्या आ. आशुतोष काळे शिर्डी संस्थानचे अध्यक्ष आहेत त्यामुळे विविध संस्थाच्या निवडणुकी करिता व वाईट प्रसंगात ज्या प्रमाणे कोपरगाव शहरातील जनते साठी ही दोन्ही कुटुंबीय धावून

येतात त्या प्रमाणे पाणी प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र यावे त्याच प्रमाणे शिवसेनेचे उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असून त्यांच्या कडे पाठपुरावा करण्यासाठी माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांनी पुढाकार घ्यावा व या दोन्ही नेत्यांना एकत्र आणून जनतेची पाणी प्रश्नातून कायमची मुक्तता करावी अशी मागणी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe