अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2021 :- जालन्याकडे कांदा घेऊन जात असलेला ट्रकचालकाचा ट्रक वरील ताबा सुटल्याने पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी घाटामध्ये केळवंडी गावाच्या हद्दीत ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात क्लीनरचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
रवींद्र उर्फ रविराज बप्पासाहेब खंडेभराड (वय २४ रा डोमेगाव ता. अंबड जि. जालना) असे मृत क्लिनरचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की,
बारामतीहून कांदा घेऊन जालन्याकडे जाणारा ट्रक (क्रमांक एम एच २१ एक्स २९९ )वरील चालकाचा ताबा सुटल्याने माणिकदौंडी घाटाच्या धोकादायक वळणावर ट्रक पलटी झाला.
या घटनेत क्लीनर रवींद्र हा गाडीखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हि घटना मंगळवारी पहाटे घडली. अपघातानंतर मृत रवींद्रला ट्रकखालून काढून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले .
मात्र त्याचा त्यापूर्वीच मृत्यू झाला होता. मयत रवींद्रचे वडील बप्पासाहेब खंडेभराड यांनी पोलिसात फिर्याद दिली असून ट्रकचालक संदिप दत्ता भडांगे याच्याविरोधात अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम