अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2021 :- नेवासे तालुक्यातील धामोरी (देवगड) या गावी राहणारे देवगड भक्त मंडळ परिवारातील धामोरी भजनी मंडळाचे अध्यक्ष यादव विठ्ठल पटारे (वय ४८) यांनी आपली स्वतःची किडनी दान करून जावयाचे प्राण मुलीचे कुंकू वाचवले.
यादव पटारे यांचे जावई आनंद सोमनाथ जोगदंड (वय ३०) रा. बालाजीनगर, औरंगाबाद यांच्या वर्षांपूर्वी दोनही किडन्या खराब झाल्या. त्यामुळे घरात व नातेवाईकांमध्ये मोठे चिंतेचे वातावरण होते.
अनेक ठिकाणी प्रयत्न करूनही किडनी मिळत नव्हती. पण तपासण्यांमध्ये सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर सासरे यादवराव यांचीच किडनी जावयांना बसवण्याचा निर्णय झाला,
ही किडनी पत्यारोपण शस्त्रक्रिया मागील आठवड्यात औरंगाबाद येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये यशस्वी पार पडली. डॉ. सुधीर कुलकर्णी, डॉ. क्षितिजा गाडेकर,
डॉ. अभय महाजन, डॉ. अंकित दाता, डॉ. राहुल टेंगसे यांनी सर्वांनी मिळून ही शस्त्रक्रिया वेगवेगळे रक्तगट असूनही यशस्वीरित्या पार पडली. या उपक्रमाचे परिसरातून व तालुक्यातून कौतूक होत आहे.
महंत सुनीलगिरी महाराज यांनी यादव पटारे यांची भेट घेऊन त्यांच्या कौतुकास्पद निर्णयाबद्दल त्यांचा सन्मान व सत्कार केला. एमजीएम हॉस्पिटलच्या सर्व स्टाफचा दोन्हीही कुटुंबाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम