नियमाधीन राहून साई संस्थानचे प्रसादलाय सुरु करावे; विखेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2021 :- कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जगात ख्याती असलेलं शिर्डी येथील साईबाबांचे मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे.

यातच साईबाबा मंदिरात दर्शनासाठी ऑफलाईन पास उपलब्ध करून देण्याच्या निर्णयाप्रमाणेच संस्थानचे प्रसादालय सुध्दा कोविडचे नियम पाळून भक्तांसाठी तातडीने सुरू करावे, अशी मागणी आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे.

कोरोनाच्या संकटानंतर प्रशासनाने राज्यातील मंदिरे सुरू झाली. मात्र मंदिरात प्रवेशासाठी ऑनलाईन पासेसची सुविधा शिर्डी संस्थानने सुरू केली होती.

ऑनलाईन पासेसची मर्यादा असल्याने शिर्डीत येणार्‍या भाविकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते. यासंदर्भात विखेंनी जिल्हाधिकार्‍यांकडे पाठपुरावा करून ऑफलाईन दर्शन पास सुरू करण्याची मागणी केली होती.

या मागणीबाबत जिल्हाधिकार्‍यांनी सकारात्मक निर्णय घेतला. ऑफलाईन दर्शन पास सुविधेच्या निर्णयाप्रमाणेच संस्थानचे प्रसादालय सुरू करण्याबाबतही प्रशासनाने आग्रही भूमिका घ्यावी, अशी मागणी आ. विखे पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe