रेल्वे गाड्या पुणतांबा रेल्वे स्टेशनवर पुन्हा नियमित थांब्यासह सुरू होणार

Ahilyanagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2021 :- करोनाची महामारी आटोक्यात आल्याने स्थिगित करण्यात आलेल्या रेल्वे गाड्या पुणतांबा (जं.) रेल्वे स्टेशनवर पुन्हा नियमित थांब्यासह सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

रेल्वेचा पुणतांबा थांबा बंद होऊ नये यासाठी प्रवासी संस्थेने वरिष्ठ पातळी प्रयत्न केले होते. दरम्यान कोविड काळात रेल्वेगाड्या सुरु न ठेवता गाड्या स्थगित करून काही बदल करण्यात आले होते.

आता हे बदल हळूहळू कमी करण्यात येत आहे. परंतु रेल्वे गाड्यांनी प्रवास करणार्‍या प्रवाशाांना कोविडचे नियम पाळावे लागणार आहे. नियम तोडल्यास कारवाईला सामोरे जावे लागेलँ.

पुणतांबा (जं.) रेल्वे स्टेशला थांबा कायम राहाण्यासाठी भारत सरकारचे रेल्वे मंत्रालय व वरिष्ट अधिकारी यांचे पुणतांबा परिसर प्रवासी संस्थेचे अध्यक्ष विजय धनवटे, उपाध्यक्ष विलास बोर्डे, विश्वस्त सुभाष कुलकर्णी,

खजिनदार संतोष चोरडिया, सरचिटणस संजय जोगदंड, दिलीप कांबळे, भारत बोर्डे, सुनिल कुलट सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ यांनी आभार व्यक्त केले आहे.

सेंट्रल रेल्वेचे महाव्यावस्थापक मुंबई यांची पुणतांबा (जं) रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांच्या अडचणी, भुयारी मार्ग व विविध एक्सप्रेस रेल्वे गाड्यांच्या थांब्यांच्या मागणीसाठी व इतर प्रश्नावर लवकरच पुणतांबा परिसर प्रवासी संस्था भेट घेणार असल्याचे अध्यक्ष विजय धनवटे यांनी स्पष्ट केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe