जिल्हयातील192 ग्रामपंचायती मधील 274 रिक्त जागांसाठी ‘या’ दिवशी मतदान होणार

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2021 :- निधन, राजीनामा, अपात्रता व इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्य पदासाठी राज्यातील 4554 ग्रामपंचायतीमधील 7130 रिक्त जागांच्या पोट निवडणूकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या ग्रामपंचायत पोटनिवडणूकांचे सर्व जिल्हाधिकार्‍यांना सूचना देणारे परिपत्रक नगरचे उपजिल्हाधिकारी (महसूल) यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना पाठविले आहे.

त्यानुसार नगर जिल्हयातील192 ग्रामपंचायती मधील 274 रिक्त जागांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार आहे.या निवडणूकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने 12 नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिध्द केली आहे. तर अंतिम मतदार यादी 18 नोव्हेंबररोजी प्रसिध्द केली आहे.

असा असणार आहे निवडणूक कार्यक्रम…

या निवडणूकांसाठी 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2021 या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. 9 डिसेंबर 2021 उमेदवारी अर्ज माघारी घेता येईल. 21 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 22 डिसेंबर रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe