अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2021 :- थकील मालमत्ता करावरील 2 टक्के शास्ती आकारणीवर 75 टक्के सुट देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. थकीत मालमत्ताधारकांना30 नोव्हेंबरपर्यंत याचा लाभ घेता येईल, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
दरम्यान याबाबत आमदार संग्राम जगताप यांनी नुकतेच मनपाकडे पाठपुरावा केला होता. 16 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या काळात कर भरणार्यांना शास्तीमाफीचा लाभ घेता येईल.

2 टक्के शास्ती आकारणीवर 75 टक्के सूट देण्यात येणार आहे. ही सूट वगळता उर्वरित रक्कम एकरकमी भरणे बंधनकारक करण्यात आले आहे.
थकीत मालमत्ता करावरील शास्तीवर सुट मिळावी, अशी मागणी आ. अरूण जगताप व आ. संग्राम जगताप यांनी महापालिकेकडे पत्राद्वारे केली होती.
त्यानंतर महापालिकेने शास्तीमाफीचा निर्णय घेतला आहे. तसेच मालमत्ता कर वसुलीसाठी अधिकार व कर्मचार्यांनी प्रभावी कामगिरी करून 100 टक्के करवसुली करावी, अशा सूचना महापालिका आयुक्तांनी दिल्या आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम