अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :- घातक शस्रासह दरोडा टाकण्याच्या किंवा लुटमार करण्याच्या तयारीत दबा धरुन बसलेल्या चोरट्यांवर पोलिसांनी छापा टाकला. ही कारवाई औरंगाबाद रोडवरील जळके बुद्रुक शिवारातील दत्त दिगंबर हॉटेलजवळ केली.
या कारवाईत पोलिसांनी एकास पकडले, परंतु अंधाराचा फायदा घेऊन चौघे पसार झाले. याप्रकरणी पोलिसांनी अनिल देसाई काळे (वय 21, राहणार येसगाव, गंगापूर) यास अटक केली.
या कारवाईच्यावेळी राहुल कात्रज पवार, मंजू कात्रज पवार, सुरेश रामभाऊ चव्हाण व गणेश रामभाऊ चव्हाण (सर्व राहणार डोमेगाव, गंगापूर, औरंगाबाद) हे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.
यावेळी पोलिसांनी अनिल काळे याच्याकडून रामपुरी चाकू व लाल मिरची पावडर जप्त केली.
या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल गणेश गलधर यांच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम