जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी ६ जणांना ताब्यात घेतले

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :-  नेवासा पोलिसांनी तालुक्यातील रांजणगावदेवी येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकून तिरट जुगार खेळणार्‍या 6 जणांना ताब्यात घेतले आहे.

दरम्यान पोलिसांनी या जुगार्यांकडून जवळपास एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, आरोपी रांजणगावदेवी गावात कणगरे वस्ती येथे चिंचेच्या झाडाखाली विनापरवाना बेकायदा तिरट नावाचा हारजितीचा जुगार खेळताना मिळून आले.

यावेळी पोलिसांनी या ठिकाणी छापा मारला. यावेळी करण्यात आलेल्या कारवाईमध्ये सहा जणांकडे जवळपास एक लाख रुपये किमतीचा (99 हजार 430 रुपये) मुद्देमाल मिळून आला.

याबाबत पोलीस कॉन्स्टेबल अमोल दत्तात्रय बुचकुल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ठकाजी म्हाळू पंडित (वय 41), सुनील जयवंत पाठक (वय 50), शंकर जगन्नाथ गोरडे (वय 66),

दगडु हरिभाऊ कापसे (वय 58), पांडुरंग रामभाऊ चौधरी (वय 65) व मधुकर उत्तम गोरडे (वय 65) सर्व रा. रांजणगाव देवी ता नेवासा यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe