अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :- नगर मनमाड महामार्गावर गुहा देवळाली शिव हद्दीवर कार दुभाजकावर धडकुन पल्टी तीनजण जखमी जखमींना राहुरी फॅक्टरी येथील खाजगी रुग्णालात उपचारासाठी हलविले जालना येथील प्राथमिक शाळेतील शिक्षक आहेत
ते शनि शिंगणापुर येथे दर्शन घेऊन शिर्डी येथे साई बाबाच्या दर्शनासाठी निघाले होते रस्ता वरील खड्डे चुकवताना कार दुभाजकावर धडकली बेल्ट बाधलेला असल्याने चालक व समोर व्यक्ती काही इजा झाली नाही मात्र मागील शिटावरील तीघे जखमी झाले आहे.
या अपघातात संतोष त्र्यंबके, विश्वनाथ लगडे, चक्रधर बागल जखमी झाले असून त्यांना तातडीने साई प्रतिष्ठानचे रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे
यांच्या मदतीने राहुरी फॅक्टरी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर कर चालविणारे शिक्षक नामदेव मोहिते , जगन्नाथ हनवटे यांना सुदैवाने कुठलीही दुखापत झाली नाही.
याबाबत उशिरापर्यंत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. साई बाबाच्या आर्शिवादाने आम्ही बचावलो असून आता
दर्शन घेऊन आम्ही गावी जाऊ वाहनाचे मोठे नुकसान झाले असले तरी आम्ही सुखरूप बचावलो असल्याचे चालक शिक्षक नामदेव मोहिते यांनी सागितले
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम