जिल्हा रुग्णालय अग्निकांड ! डॉ. विशाखा शिंदे यांच्यासह चौघांना जामीन

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :-  जिल्हा रुग्णालयातील अग्निकांड प्रकरणी अटक करण्यात आलेल्या डॉ. विशाखा शिंदे यांच्यासह चौघांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. याबाबत जिल्हा व सत्र न्यायालयाने आदेश दिला आहे.

जिल्हा रुग्णालयातील कोविड अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगी प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या सदोष मनुष्यवधाचा गुन्ह्यात विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना आनंत यांना अटक करण्यात आली होती.

दरम्यान परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना आनंत यांच्या वतीने ॲड. महेश तवले तर विशाखा शिंदे यांच्या वतीने ॲड. योहान मकासरे यांनी बाजू मांडली तर सरकारी पक्षाच्या वतीने ॲड.अनिल ढगे यांनी बाजू मांडली या गुन्ह्याचे तपास अधिकारी संदीप मिटके यावेळी हजर होते.

नेमका कोर्टात काय झाला युक्तिवाद? जाणून घ्या सविस्तर जेव्हा घटना घडली त्यावेळी या प्रकरणातील शिंदे पठारे आणि त्यांना आनंद यांनी वॉर्डमधील रुग्णांना वाचवण्याचा प्रयत्न केला तसेच कंत्राटी कामगार असल्यामुळे आस्मा शेख व त्यांना आनंद यांचा कार्यकाल संपल्यानंतरही मदतनीस म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिलेल्या

आदेशामुळे कामावर हजर होते. त्यामुळे या प्रकरणात यांचा कोणताही दोष नाही. तर मकासरे यांनी बाजू मांडताना सांगितले की या प्रकरणातील डॉ. विशाखा शिंदे या शिकाऊ डॉक्टर असून त्या या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी आल्या आहेत.

त्यामुळे आरोग्य मंत्र्यांनी आदी त्यांचे आरोग्य अधिकारी म्हणून निलंबन केले होते. मात्र त्यांची चूक लक्षात येताच निलंबन रद्द केल्याचा न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

त्यामुळे या प्रकरणात जामीन मिळावा अशी मागणी केली सरकारी वकील अनिल ढगे यांनी या जामीन अर्जावर आक्षेप घेत जमिनीला तीव्र विरोध दर्शवला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्या नंतर न्यायालयाने चार आरोपींचा जामीन अर्ज काही अटी शर्तींवर जामीन मंजूर केला

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News