गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांची धडाकेबाज कारवाई… लाखोंचा माल केला जप्त

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :- जिल्ह्यातील अवैध धंदे चालकांवर पोलिसांकडून कारवाई करण्याचा धडाका सुरूच आहे. नुकतेच पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी अशीच एक कारवाई करत गावठी दारू अड्ड्यावर छापा टाकून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती समजली कि, गोंधवणी परिसरात, वडारवाडा येथे गावठी हातभट्टी दारू अड्डे व हातभट्टी दारू तयार करत आहेत

अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला. सदर परिसरातील सर्व गावठी हातभट्टी दारू करण्यासाठी मुद्देमाल एक टेंपो व एक दुचाकी असा एकूण 6,43,955 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे .

या प्रकरणातील आरोप…

1) श्रीकांत प्रभाकर काळे, रा कदम वस्ती श्रीरामपूर

2) सागर माणिक शिंदे, रा. गोंधवणी ता श्रीरामपूर

3) भीमराव काळे रा अशोक नगर ता श्रीरामपूर

4) दत्तात्रेय जानकीराम मंचरे रा वैजापूर

5) दीपक वसंत शेलार रा अशोक नगर

6) अशोक काशिनाथ शिंदे( फरार)

7) बाप्पू नागू गायकवाड ( फरार)

8) अर्जुन फुलारे ( फरार) सर्व राहणार गोंधवणी वडारवाडा ता श्रीरामपूर यांचेविरुध्द नितीन शिरसाठ यांचे फिर्यादीनुसार श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन व राज्य उत्पादन शुल्क कार्यालय श्रीरामपूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe