अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- जनतेसाठी माझी ३६५ दिवस व २४ तास अविरत सेवा सुरू आहे. नीलेश लंके आणि सर्वसामान्य जनता हे एक समीकरण बनले असून,
मी आता केवळ पारनेरचा नव्हे, तर महाराष्ट्राचा आमदार असल्याचे सांगतो, त्यामुळे अनेकांना माझ्याविषयी भीती तयार झाली असून,
सकाळी उठल्याबरोबर ते माझ्यावर बोलायला सुरुवात करतात; परंतू मी त्या गोष्टीला भीक घालत नाही, पैसा नव्हे तर सर्वसामान्यांचा आशीर्वाद पाठिशी असावा लागतो,
अशा शब्दांत आमदार नीलेश लंके यांनी नाव न घेता त्यांच्यावर तोंडसुख घेणाऱ्यांचा समाचार घेतला. पाथर्डी तालुक्यातील एका कार्यक्रमाला आमदार लंके यांनी भेट दिली, या वेळी ते बोलत होते.
या देवस्थानच्या विकासासाठी कुठून आणि कसा निधी द्यायचा हे मला सांगण्याची गरज नाही. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या या देवस्थानच्या कार्यक्रमानिमित्त दोन्ही समाजातील भाविकांचे कौतुक करत
अशाच पद्धतीने सर्वांनी हा हिंदुस्थान आपला आहे, या भूमिकेतून सर्वांनी गुण्यागोविंदाने एकत्रित राहण्याची गरज आहे. कोरोना गेलेला नाही,
त्यामुळे मास्क वापरत जा, प्रशासनाने घातलेल्या नियमांचे पालन करा, कोरोनाला हद्दपार करायची जबाबदारी केवळ सरकारची नाही तर तुमच्या आमच्या सर्वांची आहे, असे आवाहन आ. लंके यांनी केले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम